मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

पैसे आणि दागिन्यांसाठी झाला चिपळुणातील निवृत्त शिक्षिकेचा खून

चिपळूण : निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांच्याकडे भरपूर पैसा व दागिने असल्याचा समज करून ट्रॅव्हल एजंटने त्यांची हत्या केल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. टूर एजंट जयेश गोंधळेकर याला अटक करण्यात आली असून, त्याच्या घरातून काही रक्कम व दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.

निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांच्या खून प्रकरणामागे पैसा हेच मुख्य कारण आहे. त्यांच्या घरातून २७ हजार रुपये व काही दागिने चोरीला गेले होते. यातील काही रक्कम जयेश याच्या घरी सापडली आहे. काही दागिनेही पोलिसांनी हस्तगत केले आहेत. आता उर्वरित दागिने आणि पळून गेल्या साथीदार शोधण्याचा कामाला गत देण्यात आली आहे. खून झाला ते उघड झाले तेव्हापासून खुनामागचे कारण आणि खून करणाऱ्या आरोपी या दोन तीन बाबत पोलिसांसमोर प्रश्नचिन्ह होते; मात्र सतत फिरण्याची आवड लक्षात घेता पोलिसांच्या दृष्टीने चौकशी केली. त्यातून हे प्रकरण उलगडले आणि पैसे दागिन्यांसाठीच आपण हा खून केल्याची कबुली प्रमुख संशयित आरोपींने पोलिसांनी दिली.

चिपळूण शहरात पोलीस यंत्रणा व नगर परिषदेने नुकतेच ८८ हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. मुख्य व अंतर्गत भागातील सर्व रस्ते आता कॅमेऱ्यांच्या निगराणीत असल्याने या प्रकरणात शोध घेताना पोलिसांना खूप मोठी मदत झाली.

या प्रकरणात अहोरात्र तपास करून अवघ्या ४८ तासांत मुख्य संस्थेत आरोपीच्या मुसक्या आवळणाऱ्या पोलीस पथकाचे कौतुक करत या पथकाला २५ हजार रुपयांचे रोख बक्षिसही जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जाहीर केले. तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी यांचे हा प्रकारात महत्त्वाचे योगदान होते. त्यामुळे त्यांनाही १० हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!