मुख्य बातमीशैक्षणिक

कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरात “गोपालकाला” मोठ्या जल्लोषात साजरा

रत्नागिरी : शहरातील कै.ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरमध्ये १६ ऑगस्ट रोजी गोपाळकाला उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. या उत्सवात इयत्ता पहिली ते चौथीतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रत्येक वर्गातील विद्यार्थी राधा – कृष्णाच्या आणि गोपगोपिकांच्या वेशभूषेत आले होते. “गोविंदा रे गोपाळा,” “आज आनंदी आनंद झाला” या कृष्ण जन्मोत्सव व दहीहंडीवरील प्रसिद्ध गाण्यांवरती फेर धरून टिपऱ्या नाचत सर्व विद्यार्थी तल्लीन होऊन दहीहंडीचा आनंद लुटत होते. सर्व शिक्षक विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी उत्तम मार्गदर्शन करत होते. या भक्तीमय आणि आनंदमय वातावरणात एकावर एक थर रचून इयत्ता चौथीच्या बालगोपाळांनी ‘दहीहंडी’ फोडली. सर्व विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. राजवाडे यांचे मार्गदर्शन लाभले. सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती राजेशिर्के, श्रीमती पांचाळ, शिक्षक श्री. ऐवळे, श्री. मोरे, श्री. गार्डी, श्री. सूर्यवंशी, श्री. वेदरे, श्री. घाणेकर, श्रीमती भोरे, श्रीमती औघडे, श्रीमती मांडवकर, श्रीमती पाडावे, श्रीमती सुतार, श्रीमती सनगरे, विक्रांत भाटकर आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम उत्तमरीत्या पार पडण्यासाठी मेहनत घेतली.

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, तसेच शालेय समितीचे अध्यक्ष मनोज पाटणकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!