मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

टेरव येथील श्रीमती सुलोचना शंकरराव कदम यांचे निधन

चिपळूण : टेरवचे माजी सरपंच (कै.) शंकरराव रामाजीराव कदम यांच्या पत्नी श्रीमती सुलोचना उर्फ अनुसया कदम (वय ८७, राधाकृष्णवाडी) यांचे १५ ऑगस्ट रोजी ठाणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले.

(कै.) शंकरराव यांच्या घराण्याला सामाजिक प्रतिष्ठा लाभल्याने व दसपटी विभागात सुपरिचित असल्याने घरी येणाऱ्या सर्वांची अदबीने चौकशी करणे, यथोचित पाहुणचार करणे यात त्यांच्या हातखंडा होता. त्यांचे प्रेमळ व आपुलकीने स्मित हास्य करून बोलणं सर्वांना भारावून टाकणारे असे होते.

त्यांच्या पश्चात पुतणे, भाची, भाचे, जावई , नातवंडे असा मोठा परिवार आहे. (कै.) सुलोचना उर्फ अनुसया यांच्या निधनामुळे समस्त ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे दशक्रिया विधी २४ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता टेरव वैकुंठ भूमी येथे होणार असून सपेंडी व उत्तरकार्य २६ ऑगस्ट रोजी राहत्या घरी समृद्धी बंगला, भवानी पेठ टेरव येथे होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!