मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

वशिष्ठी नदीची पाणी पातळी इशारा पातळीवर

चिपळूण : सध्या वशिष्ठी नदीची पाणी पातळी ५ः७० मी म्हणजेच इशारा पातळीवर आहे. कोळकेवाडी धरणाची पाणी पातळी १३४.५० मी. आहे. कोळकेवाडी धरणाच्या परिसरात काल सकाळी ८ वाजल्यापासून आज ८ वाजेपर्यंत म्हणजे २४ तासामध्ये २२० मिमी पाऊस पडलेला आहे. आज सकाळी ८ ते ११ यावेळेत ७३ मिमी पाऊस पडलेला आहे.

सर्व मशीन बंद केलेल्या आहेत. सकाळी ९ः५० वाजता भरती होती. आता दुपारी ३ः५० वा ओहोटी आहे. पुढील अर्धा तास महत्त्वाचा आहे. ११ ठिकाणी नगरपालिका, महसूल, पोलीस व NDRF यांची पथके ठेवण्यात आलेली आहेत. ५ ठिकाणी बोटी ठेवण्यात आलेल्या आहेत. बाजारपेठ, मुरादपूर, चिंचनाका, वडनाका, आईस फॅक्टरी, पेठमाफ इंडियन जीम या भागात एक ते दीड फूट पाणी आलेले आहे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!