क्रीडामुख्य बातमी

समाजकल्याण विभागामार्फत जिल्हास्तरीय क्रीडा व कला सांस्कृतिक महोत्सव

रत्नागिरी : कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्या वतीने मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थी आणि समाजकल्याण कर्मचाऱ्यांसाठी जिल्हास्तरीय क्रीडा व कला/सांस्कृतिक महोत्सव २८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, रायपाटण (पाचल, ता. राजापूर) येथे आयोजित केला आहे.

या महोत्सवातंर्गत जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सव २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ ते १० वाजता होणार असून, समाजकल्याण मुंबई विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व जिल्हा कोषागार अधिकारी प्रविंद बिरादार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष सहायक आयुक्त समाजकल्याण दीपक घाटे आहेत.

जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सव २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता होणार असून, समाजकल्याण मुंबई विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष सहायक आयुक्त समाजकल्याण दीपक घाटे व जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांची प्रमुख उपस्थिती आहे.

पारितोषिक वितरण समारंभ ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता सह आयुक्त (शिक्षण) समाजकल्याण आयुक्तालय प्रमोद जाधव यांच्या हस्ते होणार असून समाजकल्याण मुंबई विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी व जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!