मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

गोवंश वाहतूक करणाऱ्या तीन इसमांवर कारवाई

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी

लांजा : ओणी ते पाचल मार्ग अणुस्कुरा घाटातून गोवंश जातीच्या जनावरांची वाहतूक होणार असल्याची विश्वसनीय बातमी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या एका पथकाला मिळाली होती. हे पथक रायपाटण येथे वाहनांची तपासणी करण्यासाठी २९ ऑगस्ट ३.३० वाजता थांबले. वाहनांची तपासणी करताना ५.५५ वाजता एक महिंद्र कंपनीची जीनीओ मॉडेलचे चारचाकी (वाहन क्रमांक MH-04-FP-6424) आणि त्या पाठोपाठ आयशर प्रो-1059 मॉडेल चारचाकी (MH-07-X-1511) ही वाहने थांबवून त्यांची तपासणी केली असता जीनीओ चारचाकी वाहनाच्या हौद्यामध्ये ८, तर आयशर चारचाकी वाहनाच्या हौद्यामध्ये ११ गोवंश जातीची जनावरे अशी एकूण १९ जनावरे यांना दोरीच्या सहाय्याने दाटी वाटीने जवळ-जवळ बांधलेली आढळून आली. याप्रकरणी ३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दोन वाहने मिळून २० लाख ६६ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच १९ गुरांची सुटका करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव दरम्यान गोवंश वाहतूक व कत्तल संदर्भातील गुन्ह्यांना प्रतिबंध व कारवाई करण्याचे तसेच त्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने २८ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक लांजा उपविभागा मध्ये गस्त करत असताना ओणी ते पाचल मार्ग अणुस्कुरा घाटातून गोवंश जातीच्या जनावरांची वाहतूक होणार आहे अशी विश्वसनीय बातमी मिळाल्याने हे पथक रायपाटण येथे वाहनांची तपासणी करण्यासाठी २९ ऑगस्ट ३.३० वाजता थांबले. वाहनांची तपासणी करताना ५.५५ वाजता एक महिंद्र कंपनीची जीनीओ मॉडेलचे चारचाकी (वाहन क्रमांक MH-04-FP-6424) आणि त्या पाठोपाठ आयशर प्रो-1059 मॉडेल चारचाकी (MH-07-X-1511) ही वाहने थांबवून त्यांची तपासणी केली असता जीनीओ चारचाकी वाहनाच्या हौद्यामध्ये ८, तर आयशर चारचाकी वाहनाच्या हौद्यामध्ये ११ गोवंश जातीची जनावरे अशी एकूण १९ जनावरे यांना दोरीच्या सहाय्याने दाटी वाटीने जवळ-जवळ बांधलेली आढळून आली.

या दोन्ही गाडीतील गोवंश जनावरांना गाडीतील हौद्यात पाणी न देता गाडीमध्ये वेदना किवा यातना होतील अशा रीतीने दोरीने बांधून तसेच त्यांच्या खाद्याची कोणतीही व्यवस्था न करता, त्यांच्या कत्तलींसाठी वाहतूक करीत असताना मिळून आले. म्हणून या गोवंश जनावरांच्या दोन्ही गाडीच्या चालकांकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे गोवंश जनावरे वाहतुकीचा परवाना अगर पशु-वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वैद्यकीय तपासणी केली नसल्याचे त्यांनी सांगितले. दोन पंचांसमक्ष नाव-गाव विचारले असता जीनीओ मॉडेलचे चारचाकी वाहनचालक विनायक मनोहर भोईटे (वय ३८ वर्षे, रा. पांगटी रोड, रेणुकानगर, निपाणी, शिरगुप्पी, ता. चिकोडी, जि. बेळगावी, राज्य कर्नाटक), आयशर चालक समीर बाळासो मुजावर (वय ३१ वर्षे, रा. वॉर्ड नं. २४, कारंडेमळा, गल्ली नं. ३, शहापुर इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे सांगितले. तसेच या दोन्ही इसमांकडे गोवंश जनावरे कोठून आणली याबाबत विचारणा केली असता त्यांनी ही गोवंश जनावरे तबरेज चाँदनीयाँ ठाकूर (ना. परटवली, ता. राजापूर) यांच्याकडून आणल्याचे सांगितले.

या दोन्ही वाहनांमध्ये मिळून आलेली एकूण १९ गोवंश गुरे कत्तल करण्यासाठी गैर कायदा बिगर परवाना अवैधरित्या वाहतूक करून घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले म्हणून या तीनही इसमांवर राजापूर पोलीस ठाण्यात प्राण्यांचे छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११ (१), (घ), (ङ), ११ (३) (क) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ (अ), ५ (ब) व ९ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११९ सह मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ६६/१९२, ३/१८१ प्राण्यांची वाहतूक नियम १९७८ चे कलम ४७, ४८, ४९, ५०, ५१, ५४, ५६ भा. न्या. सं २०२३ चे कलम ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह श्रेणी पोलीस उनिरीक्षक श्री. ओगले, स.पो.फौ. गोटे, पो.हवा झोटे, पो.हवा पालकर, पो. हवा राजवैद्य, पो.हवा कदम, पो.हवा सवाईराम, पो.हवा शेट्ये, चा.पो.कॉ कांबळे यांनी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!