मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हाराजकारण

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अनुपस्थितीमुळे जि.प. पडवे गटात उद्या होणारा पक्षप्रवेश सोहळा आणि जाहीर मेळावा रद्द 

महेश नाटेकर यांची स्पष्टोक्ती

आबलोली (संदेश कदम) : राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अधिपत्याखाली उद्या (४ सप्टेंबर) आबलोली येथे जिल्हा परिषद शिवसेना शिंदे पडवे गटाचा पक्ष प्रवेश सोहळा आणि जाहीर मेळावा आम्ही आयोजित केला होता; परंतु काही कारणास्तव हा पालकमंत्री सामंत यांना यावेळी उपस्थित राहता येत नसल्यामुळे हा मेळावा रद्द करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषद पडवे गटाचे माजी सदस्य महेश नाटेकर यांनी पत्रकारांना दिली.

याबाबत सविस्तर माहिती देताना श्री. नाटेकर म्हणाले, मला उद्योगमंत्री उदय सामंत यांचा फोन आला आणि हा मेळावा आपण पुढे घेऊन या, असे सांगितले. परंतु पक्षप्रवेश सोहळा आणि जाहीर मेळाव्याची तयारी ताकतीनिशी केल्याची कल्पना त्यांना दिली. तसेच हा मेळावा पुढे घेऊ नका, अशी विनंतीही केली; परंतु यामागचे मुख्य कारण सांगताना सामंत म्हणाले की, महाराष्ट्र राज्याची उद्योग पॉलिसी हा भव्य दिव्य कार्यक्रम असल्याने जे उद्योग, व्यवसाय करणारे मंडळी आहेत ते एकत्र येऊन राज्याची उद्योग पॉलिसी ठरते. मी उद्योग मंत्री असल्याने या कार्यक्रमाला हजर राहणे हे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे उद्या होणारा पडवे जिल्हा परिषद गटाचा पक्ष प्रवेश सोहळा आणि जाहीर मेळावा सभेचा कार्यक्रम पुढे ढकला. मी तुम्हाला तारीख व वेळ देईन तेव्हा आपण पक्षप्रवेश सोहळा व जाहीर मेळावा घेऊया. त्यामुळे उद्योगमंत्री, पालकमंत्री उदय सामंत यांच्या अनुपस्थितीमुळे जिल्हा परिषद पडवे गटातील उद्या (४ सप्टेंबर) आबलोली येथे शिवसेना शिंदे पक्षाचा पक्षप्रवेश सोहळा आणि जाहीर मेळावा रद्द करण्यात आला आहे.

श्री. नाटेकर पुढे म्हणाले, “उद्याच्या पक्षप्रवेश सोहळ्याची आणि जाहीर मेळाव्याची पूर्व जय्यत तयारी केलेली होती. जवळजवळ दोन हजारांवर मंडळी मेळाव्याला उपस्थित राहणार होती. शेकडो कार्यकर्ते, शेकडो म्हणण्यापेक्षा जी मंडळी उपस्थित राहणार होती ती मंडळी सर्व प्रवेशकर्तीच होती. यामध्ये माजी सभापती अनेक शाखाप्रमुख, विद्यमान सरपंच, उपसरपंच असे अनेक कार्यकर्ते उद्योगमंत्री, पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेश सोहळ्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातील तर मंडळी असतीलच; परंतु राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, भाजपातील कार्यकर्तेही शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत.

हा पक्षप्रवेश गुहागरच्या विद्यमान आमदारांना धक्कादायक बाब होणार की, काय कसे काय या प्रश्नाला उत्तर देताना श्री. नाटेकर म्हणाले की, कोणाला धक्का द्यायचा आणि कोणाला धक्का नाही द्यायचा हा विषय महत्त्वाचा नाही; परंतु जी मंडळी, ग्राउंड लेव्हलला काम करतात आणि जी लोक घराघरात जाऊन काम करतात, या लोकांच्या पाठीमागे जनता ही उभी राहतेच. हे मी याच्या आधी विद्यमान आमदारांच्या विरोधातही त्यावेळेला मी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडून आणल्या होत्या. या वेळेलाही मी शिवसेना शिंदे गटाचे काम करणार आहे. पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मी तुम्हाला ग्वाही देतो हा पडवे जिल्हा परिषद गट हा शिवसेनामय होईल. त्या वेळेलाही मी शिवसेना धनुष्यबाण हातात घेऊन होतो. त्याच धनुष्यबाण चिन्हावर मी निवडणूक लढलो होतो आणि याही वेळेला मी शिवसेनेचे चिन्ह धनुष्य घेऊन आहे. त्याच्यामुळे मला काही कुठची अडचण दिसत नाही, असे श्री. नाटेकर यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!