कोकणमहाराष्ट्रमुख्य बातमी

समर्थ विचार फाउंडेशन आयोजित गणेश सजावट स्पर्धेत अनिल पाटील व जयेश ठाकूर प्रथम

अलिबाग (राजेश बाष्टे) : श्री समर्थ विचार फाउंडेशन रायगड यांच्या वतीने आयोजित आद्य नाईक स्मृती गणेश सजावट स्पर्धेमध्ये मोठे शहापूर येथील अनिल पाटील व हाशिवरे येथील जयेश ठाकूर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. या स्पर्धेत १२३ स्पर्धक सहभागी झाले होते.

श्री समर्थ विचार फाउंडेशन रायगडच्या वतीने अलिबाग तालुकास्तरीय आद्य नाईक स्मृती गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन केले होते. टाकाऊपासून टिकाऊ व इको फ्रेंडली गणेश सजावट स्पर्धेत मोठे शहापूर येथील अनिल पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळविला. त्यांनी माणसाच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या शिक्षा हा देखावा सादर केला होता. त्यांना ५ हजार ५५५ रुपये द्वितीय क्रमांक हेमंत पाटील चरी यांनी खेड्याकडे चला या देखाव्यास ३ हजार ३३३ रुपये, तृतीय क्रमांक वर्षा पाटील खिडकी यांच्या बदलेले गोविंदा या देखाव्याला २ हजार २२२ रुपये, चतुर्थ क्रमांक विष्णू मोकल हाशिवरे यांच्या सिंदूर – पहलगाम हल्ला या देखाव्याला १ हजार १११ रुपये, तर पंचम क्रमांक रवीकांत म्हात्रे कावाडे यांच्या छावा या देखाव्यास १ हजार १११ रुपये आणि प्रत्येकी स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. उत्तेजनार्थ पारितोषिक किरण म्हात्रे केतकीचामळा यांनी जीर्ण मंदिर, संजय म्हात्रे रांजणखार विठ्ठल वारी, स्वागत ठाकूर नारंगी जीर्ण मंदिर, कमलेश ठाकूर हाशिवरे अश्मयुगीन गणेश, सुमित म्हात्रे रांजणखार शिवाजी महाराज व किल्ला यांना देण्यात आले.

टाकाऊ पासून टिकाऊ या गटात प्रथम क्रमांक जयेश ठाकूर हाशिवरे यांच्या स्वामी समर्थ या देखाव्यास ३००१ रुपये, द्वितीय क्रमांक अर्जुन गावंड गुरुजी फोफेरी यांच्या निसर्गातील गणेश या देखाव्यास २००१ रुपये, तृतीय क्रमांक दिशांत ठाकूर मानकुळे ऑपरेशन सिन्दुर या देखाव्यास १००१ रुपये आणि प्रत्येकी स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. उत्तेजनार्थ पारितोषिक श्रीहरी म्हात्रे नवखार कृषी प्रधान देश, हर्षिता पाटील मांडवखार जुनी परंपरा या देखाव्यास प्रत्येकी ५०१ रुपये, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

गणेश सजावट स्पर्धेचे परीक्षक म्हणून जे. जे. ऑफ आर्ट स्कूलचे सुरेश पाटील,ज्येष्ठ पत्रकार आविष्कार देसाई, ज्येष्ठ छायाचित्रकार समीर मालोदे, लहू पाटील, रत्नाकर पाटील यांनी काम पाहिले.

विजयी स्पर्धक, परीक्षक व सहभागी सर्व स्पर्धकांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र अमित नाईक राष्ट्रवादी काँग्रेस अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघ प्रमुख, प्रा. ज्ञानेश्वर कुलकर्णी, अर्जुन गावंड, प्रवीण पाटील, माजी सरपंच वैशाली पाटील, रविंद्र पाटील, अमरनाथ पाटील यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. यावेळी ग्रामस्थ मंडळ कनकगिरी, एकविरा मित्र मंडळचे सदस्य, अमित नाईक मित्र मंडळ सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीसमर्थ विचार फाउंडेशन रायगडचे अध्यक्ष ॲड. रत्नाकर पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कांचन म्हात्रे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उमेश गावंड, यश पाटील, सत्यविजय धोदरे, चिंतामण पाटील, मनोज पाटील, कौशल पाटील, नेहा पाटील, प्रथा पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!