Uncategorized
जवळेथर परिसरात वीज पडून दोन कामगार जखमी

राजापूर : अवकाळी पाऊस पडत सुरू असताना जवळेथर परिसरात वीज पडून दोन कामगार जखमी झाल्यी घटना काल (१६ मे) दुपारी ३.१५ वाजता घडली. जखमींना उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. प्रकाश अंबाजी मोरे (५२), विलास शिवाजी धावडे (४३) अशी जखमी झालेल्यीं नावे आहेत.
शुक्रवारी दुपारनंतर जवळथेर परिसरात वीजांच्या कडकडाटासह पावसाचा शिडकाव झाला. दरम्यान प्रकाश मोरे व विलास धावडे हे गावात बांधकाम करत असताना अचानक अंगावर वीज कोसळल्याने ते दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांनाही जवळेथर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांनतर अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेनंतर प्रशासन तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते.



