मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

पोर्टलमधील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून जन्म-मृत्यू दाखले वेळेत उपलब्ध करून द्यावेत

भाजपा अल्पसंख्याक सेलचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा खेड पालिकेचे नगरसेवक, गटनेते रहीम सहीबोले यांची मागणी

खेड : पोर्टलमधील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून जन्म-मृत्यू दाखले वेळेत, सुलभ व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून द्यावेत या मागणीचे निवेदन भाजपा अल्पसंख्याक सेलचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा खेड पालिकेचे नगरसेवक गटनेते रहीम सहीबोले यांनी आज (२१ जुलै) दिले.

सध्या नगरपालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणीच्या ऑनलाइन पोर्टलमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांना जन्म व मृत्यू दाखले मिळविण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे शैक्षणिक प्रवेश, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा, शासकीय योजना तसेच इतर विविध प्रशासकीय कामांमध्ये विलंब होत असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन खेड पालिका स्वतः पुढाकार घेत असून, तालुक्यातील प्रत्येक शाळेला पत्राद्वारे सूचना देत आहे की, ऑनलाइन पोर्टल तात्पुरते बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेश अथवा इतर शैक्षणिक प्रक्रिया थांबवू नयेत. पोर्टल सुरळीत सुरू झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांचे जन्मदाखले व मृत्यूदाखले उपलब्ध करून दिले जातील. अशा प्रकारचे पत्र प्रत्येक शाळेला देण्यात येत आहेत.हे सगळ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचे विचार करता सकारात्मक पाऊल मानले जाणार आहे. यासाठी तात्पुरत्या काळासाठी ऑफलाइन दाखले देण्यात येत आहेत.

या पार्श्वभूमीवर पोर्टलमधील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून जन्म-मृत्यू दाखले वेळेत, सुलभ व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून द्यावेत, तसेच नागरिकांना अनावश्यक हेलपाटे मारावे लागू नयेत, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.

सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांच्या हितासाठी भारतीय जनता पक्ष सातत्याने आवाज उठवत राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या वेळी भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!