मुख्य बातमी

नेवरे येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १९७ नागरिकांची आरोग्य तपासणी

मालगुंड आरोग्य केंद्राचे काम कौतुकास्पद जि. प. सदस्य राजेश साळवी

रत्नागिरी : मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी, जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिराला प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड अंतर्गत आरोग्य उपकेंद्र नेवरे येथे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शिबिराचे उद्घाटन जनआरोग्य समिती मालगुंडचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य मा. राजेशजी साळवी, पंचायत समिती सदस्या मा. पूर्वा दुर्गवली, जनआरोग्य समितीचे सचिव व वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश डोके तसेच प्रशिक्षणार्थी वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर शिंदाडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

यावेळी माजी सरपंच व प्रशासक दीपक फणसे, माजी सरपंच अनंत शिंदे, सदस्य कुंती पवार, ऋतुजा गुरव, सागर मायंगडे, पोलीस पाटील स्नेहा पेडणेकर, ग्रामसेवक प्रणिता सावंत, अंगणवाडी पर्यवेक्षिका भागवत, जिल्हा रुग्णालयाच्या नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रीती फुके, समता फाउंडेशनचे श्री.नितेश शेट्ये, सरपंच मदा मोरे, पत्रकार वैभव पवार व सचिन दुर्गवली, आरोग्य निरीक्षक, सीएचओ, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका लॅब टेक्निशियन श्रुतिका मोहित गट प्रवर्तक, श्रीम. सिद्धी आढाव तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिरामध्ये १९७ नागरिकांची सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये ईसीजी, नेत्र तपासणी, वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आरोग्य तपासणी, रक्त तपासणी, क्षयरोग निदानासाठी थुंकी तपासणी, रक्तदाब व रक्तातील साखर तपासणी, वजन व उंची मोजणी, आयुष्मान भारत (आभा) कार्ड नोंदणी शालेय मुलांचे लसीकरण तसेच बाल लसीकरण अशा विविध आरोग्य सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आरोग्य निरीक्षक डॉ. परशुराम निवेंडकर यांनी केले. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा त्यांच्या गावातच उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!