आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात रिपब्लिकन (आठवले) पक्षातर्फे गुहागर तहसीलदार कार्यालयावर २४ रोजी निदर्शने

आबलोली (संदेश कदम) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका गुहागर यांच्या वतीने २४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता गुहागर तहसीलदार कार्यालय येथे निदर्शने करून त्यानंतर निवेदन देण्यात येणार आहे.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या आरक्षणाचे अ, ब, क, ड, उपवर्गीकरणाद्वारे विभाजन करण्याचा कुटील डाव शासनाचा असून सामाजिक न्याय संविधानातील समता, स्वातंत्र व बंधुता या तत्वांचा शासनाला विसर पडल्यामुळे आणि भारतीय संविधान बचावासाठी तसेच आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात हे निदर्शन केले जाणार आहे.
यावेळी गुहागर तालुक्यातील सर्व समाज घटकांनी, धार्मिक संघटनांनी तसेच विविध पक्षांनी एकत्रित येऊन बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका गुहागर या पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप शंकर कदम, सरचिटणीस सुनील महादेव गमरे यांनी निवेदनाद्वारे केले आहे.



