अलिबागच्या कन्या शाळेचे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत उज्ज्वल यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

अलिबाग (राजेश बाष्टे) : हाशिवरे येथे पार पडलेल्या तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत १७ वर्षे वयोगटात खो-खो क्रीडा प्रकारात येथील कन्या शाळेच्या खेळाडूंनी पारंपरिक प्रतिस्पर्धी हाशिवरे हायस्कूलचा पराभव करून प्रथम क्रमांक पटकावला. या संघाची निवड जिल्हास्तरासाठी झाली आहे.
सर्व खेळाडूंना प्रा. श्री. आसोले यांचे मार्गदर्शन मिळाले. कन्या शाळेच्या खो खो संघात तनुश्री पेरेकर, मानसी ठाकूर, जयश्री पवार, वैदही जोशी, कुसुम पवार, अस्मिता जाधव, भारती राठोड, निशा पवार, सांची वाघमारे, सई म्हात्रे, तनुजा पवार, मयुरी पवार या खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवले. यापैकी उत्कृष्ट खेळाडू म्हणून सांची वाघमारे हिची निवड झाली.
खेळाडूंच्या नेत्रदीपक कामगिरीसाठी संस्थेच्या कार्यवाह तथा शाळा समिती चेअरमन ॲड. पल्लवी पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका सरला किणी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व त्यांना जिल्हास्तरावर यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.



