मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

पोषण आहार महोत्सवातून महिलांचे प्रबोधन व्हावे हा मुख्य उद्देश : सौ. रिया रेपाळ

आबलोली (संदेश कदम) : मुख्यमंत्री प्रधान समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली या ग्रामपंचायतीने “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” अभियान आयोजित केले आहे. या अभियानात महिला आरोग्य शिबिर आयोजित केलेले असून अभियानात अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या असून शासनाकडून मिळणारा पोषण आहार याबद्दल महिलांचे गैरसमज निर्माण झालेले असतात ते गैरसमज महिलांच्या मनातून दूर करण्यासाठीच आम्ही शासनाच्या पोषण आहाराचा महापोषण आहार महोत्सव साजरा करीत असल्याची माहिती अंगणवाडी सेविका सौ. रिया रेपाळ यांनी दिली.

गुहागर तालुक्यातील आबलोली, खोडदे, मासू या गावातील अंगणवाडी सेविकांनी लहान बाळांना शासनाचा टीएचआर आहार घरी दिला जातो; अनेकदा ते बाळ, मूल खात नाही. यासाठीच अंगणवाडी सेविकांनी टीएचआर आहारापासून बनवलेल्या विविध प्रकारच्या पदार्थांची रेसिपी पाककलेद्वारे पोषण आहाराचा महोत्सव साजरा करत प्रदर्शित केला आहे. या पोषण आहार महोत्सवाच्या प्रदर्शनातून महिलांचे प्रबोधन व्हावे आणि बाळाला सकस आहार मिळावा हा मुख्य उद्देश असल्याचे अंगणवाडी सेविका सौ. रिया रेपाळ यांनी सांगितले.

“किशोरवयीन मुली, गरोदर माता, स्तनदा माता यांच्या पोषणासाठी पोषक आहाराचे आम्ही प्रदर्शन केले आहे. यामध्ये परसबागेतील पालेभाज्या किंवा सेंद्रिय भाज्या, सेंद्रिय गुळ, ड्रायफूड घरच्या घरी आपण आहार बनवतो तोच आहार किती उत्तम पद्धतीने बनवला जाऊ शकतो हे आपण आजच्या महोत्सव प्रदर्शनातून बघत आहोत. बीट हे कंदमुळं आपण किंवा आपले बाळ असेच खाऊ शकत नाही; परंतु बिटपासून बनवलेल्या पुऱ्या आवडीने खाऊ शकतो. मेथीचे लाडू, अळूवड्या, मोड आलेल्या भाज्या, पालेभाज्या किंवा ड्रायफूटपासून बनवलेल्या चिक्क्या मुले आवडीने खाऊ शकतात. यासाठी आम्ही घरगुती पद्धतीने हे पदार्थ बनवलेले आहेत. हे पदार्थ बनवताना महागड्या वस्तू खरेदी करण्याची काहीही गरज नाही. शासनाच्या टीएचआरमधून दिलेल्या आहारांपासूनच ह्या रेसिपी आम्ही बनवलेल्या आहेत आणि त्याचा महिलांनी लाभ घ्यावा. अंगणवाडी सेविकांकडून मुलांसाठी मिळणारा पोषण आहार प्रत्येक महिलांनी, पालकांनी आपल्या मुलांना द्यावा. यासाठी पालकांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहनही अंगणवाडी सेविका रिया रेपाळ केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!