मुख्य बातमीराजकारण
पंचायत समिती सभापती पदाच्या आरक्षणासाठी ३० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सोडत

रत्नागिरी : जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतीची पदे नागरिकांचा मागासप्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिलांसाठी सोडत पद्धतीने आरक्षित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी यांच्या दालनात ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सभा आयोजित केली असल्याचे प्र. उपजिल्हाधिकारी (सा.प्र), चंद्रकांत सूर्यवंशी यांनी सांगितले.
जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्यस्तरावरील सर्व मान्यता प्राप्त राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष किंवा त्यांच्या एका प्राधिकृत प्रतिनिधीस पंचायत समिती सभापतीपदाच्या आरक्षणाच्या सभेस उपस्थित राहता येईल, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.



