जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या इच्छुकांसोबत आज आढावा बैठक
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची रत्नागिरी तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसोबत उद्या (१९ डिसेंबर) दुपारी ३ वाजता माजी खासदार विनायक राऊत यांच्या अभ्युदय नगर येथील संपर्क कार्यालयात आढावा बैठक होणार आहे.
ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उपनेते तथा माजी आमदार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने, जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर व जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे.
बैठकीला रत्नागिरी तालुक्यातील सर्व शिवसेना, महिला आघाडी, युवासेना, शिवसहकार सेना, रिक्षासेना व अंगीकृत सर्व संघटनांचे पदाधिकारी, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, विभाग संघटक, उपविभागप्रमुख, आजी- माजी लोकप्रतिनिधी आणि इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी केले आहे.



