मुख्य बातमी

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवा : जिल्हाधिकारी

रत्नागिरी : शाळा, महाविद्यालयये विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करा. सर्व यंत्रणांचा सहभाग घेऊन राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवा, अशी सूचना जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज आरोग्य विभागाच्या विविध विषयांच्या बैठका घेण्यात आल्या. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, प्रादेशिक मनोरुग्णालय अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी एन. जी. बेंडकुळे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, सर्व शाळा, महाविद्यालये विशेषत: विद्यार्थी यांच्यावर लक्ष केंद्रीत करून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी मोहीम राबवा.

प्रादेशिक मनोरुग्णालय रुग्ण कल्याण नियमक मंडळ समिती बैठक

प्रादेशिक मनोरुग्णालय रुग्ण कल्याण नियमक मंडळ समितीच्या आज झालेल्या बैठकीत ६ लाख २१ हजार २७४ खर्चास मान्यता देण्यात आली. याबाबत डॉ. फुले यांनी सविस्तर माहिती दिली.

गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्र अधिनियम १९९४ दक्षता समितीच्या बैठकीत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जगताप यांनी माहिती दिली. जिल्ह्यामध्ये असणारे १०९ सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करण्यात येते. त्यावर ही तपासणी कठोर करा. गर्भलिंग चाचणी होणार नाही, याबाबत दक्षता घ्या, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

जिल्हा एडस् प्रतिबंध व नियंत्रण समितीची बैठकही यावेळी झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!