मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

खेड नगरपालिकेसाठी व्हॅक्युम गाडी दाखल

खेड : महाराष्ट्र शासन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नगरपालिकेत नवीन व्हॅक्युम गाडी दाखल झाली असून खेडच्या नगराध्यक्ष माधवी राजेश बुटाला यांनी वाहनाचे विधिवत पूजन करून वाहनाचे लोकार्पण केले.

हे वाहन मिळण्यासाठी गृहराज्य मंत्री योगेश कदम यांचे विशेष सहकार्य लाभले. या कामी विशेष प्रयत्न व पाठपुरावा उपनगराध्यक्ष सतीश चिकणे व स्वछता आरोग्य सभापती तौसिफ खोत यांनी केला.

या कार्यक्रमास शिवसेना गटनेते नगरसेवक निकेतन पाटणे, बांधकाम सभापती सुनील दरेकर, समाजकल्याण सभापती यश खेडेकर, सांस्कृतिक समिती सभापती भुषण चिखले, महिला व बाल कल्याण सभापती रसिका खेडेकर, नगरसेवक मिनार चिखले, स्वप्नील सैतवडेकर, प्रेमळ चिखले, अरिफ मुल्लाजी, भाजप गटनेते रहीम सहिबोले, नगरसेविका संजना कुडाळकर, दीप्ती शिगवण, रेश्मा खतिब, अंजुम कुरणे, स्वप्नाली चव्हाण उपशहरप्रमुख तुषार सापते व नगरपालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!