मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा
कुंभवणे-आरेगाव मार्गावर वाहतूक बंद : प्रवाशांचे हाल

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील कुंभवणे-आरेगाव या मार्गावर गेले अनेक दिवस मोऱ्यांचे काम सुरू असल्याने या मार्गावर गुहागर आगाराची एसटी बस सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना व विद्यार्थ्यांना एकतर पायपीट करावी लागत आहे अथवा खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. यात वेळ व जास्त पैसा जात असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

या गावातील निकृष्ट रस्त्यांसंदर्भात काँग्रेसचे दिवंगत नेते शंकर गुरव यांनी त्यावेळी त्यांच्या काळात या गावातील रस्ते सरकारने त्वरित करावे, अशी आग्रही मागणी केली होती. कंत्राटदार, ठेकेदार यांनी हे काम त्वरित पूर्ण करावे तसेच खासदार निधीतून संपूर्ण रस्ता दुरुस्त करावा, अशी आग्रही मागणी समाजसेवक व ज्येष्ठ पत्रकार पराग कांबळे यांनी केली आहे.


