मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

आरजीपीपीएल कंपनीमध्ये ५१ व्या एनटीपीसी स्थापना दिनानिमित्त विविध उपक्रम संपन्न 

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनी कंपनीमध्ये ५१ व्या एन.टी.पी.सी. स्थापना दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रम संपन्न झाले.

आरजीपीपीएल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल देसाई यांच्या हस्ते एन.टी.पी.सी.चा ध्वज फडकविण्यात आला. त्यानंतर त्यांनी अधिकारी, कर्मचारी व कामगार वर्गाला संबोधित केले. याप्रसंगी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते केक कापण्याचा आला.

एनटीपीसी स्थापना दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले. एनटीपीसीच्या गेल्या काही वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचे प्रतीक आहे आणि ऊर्जा क्षेत्रातील शाश्वतता, उत्कृष्टता आणि वाढीसाठी सामूहिक वचनबद्धतेची पुष्टी करते. या कार्यक्रमाला एजीएम. ओ अँड एम आनंद मलाक, एचआर, एजीएम स्नेहाशीष भट्टाचार्य, सीएफओ राजेश नंदकर, सीआयएसएफचे असिस्टंट कमांडर सोनू शर्मा, बालभारती पब्लिक स्कूलचे प्राचार्य सुरजीत चटर्जी, यूपीएलचे इन्चार्ज नितिन खानविलकर, एचआर मॅनेजर अमित शर्मा, एचआर मॅनेजर श्रीमती गुंजन शर्मा तसेच सर्व आरजीपीपीएल कंपनीतील सर्व वरिष्ठ अधिकारी कर्मचारी व कामगार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!