मुख्य बातमी

रा. भा. शिर्के प्रशालेचे “इन्स्पायर” यश

रत्नागिरी : नागपूर येथील राज्य विज्ञान संस्था आणि रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभाग (माध्यमिक) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच झालेल्या इन्स्पायर ॲवॉर्ड मानक २०२३/२४ व २०२४/२५ या वर्षांतील निवडक मॉडेल्सच्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात रा. भा. शिर्के प्रशालेच्या तन्मय लक्ष्मण कोकरे (इ. ९वी) या विद्यार्थ्याच्या मॉडेल्सची राज्य स्तरासाठी निवड झाली.

तन्मयने FOOD SPOILAG DETECTOR ही प्रतिकृती प्रदर्शनात मांडली होती. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एकूण १०३ मॉडेल्स स्पर्धेत होते. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वैदेही रानडे आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या हस्ते तन्मयला प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.

तन्मयला मुख्याध्यापक श्री. कांबळे, श्री. मुंडेकर, श्री. पडवेकर, श्री. चव्हाण आणि पालक यांचे मार्गदर्शन लाभले.

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी,प्रशालेचे सर्व शिक्षकवृंद यांनी तन्मयचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!