मुख्य बातमी

सामाजिक कार्यकर्ते आशिष मोरे यांचा शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश

रत्नागिरी : आमदार प्रमोद जठार यांनी “शत-प्रतिशत भाजपा”चा दिलेला संकल्प आता प्रत्यक्षात उतरू लागल्याचे चित्र रत्नागिरी शहरात दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक १४ मधील सामाजिक कार्यकर्ते आशिष मोरे यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. भाजप जिल्हा कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमाला आमदार प्रमोद जठार, भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, शहराध्यक्ष दादा ढेकणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या प्रयत्नातून आशिष मोरे यांनी भाजपच्या विचारधारेत काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक १४ मध्ये भाजपची संघटनात्मक ताकद आणखी वाढणार असल्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

आमदार प्रमोद जठार यांच्या विजयापासून भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, अनेक जण पक्षात काम करण्यासाठी पुढे येत आहेत. आगामी काळात शहरातील विविध प्रभागांमध्ये भाजप अधिक मजबूत करण्यासाठी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत.

आशिष मोरे हे यापूर्वी शिवसेना शिंदे गटातील प्रमुख कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत प्रभाग क्रमांक १४ मध्ये उल्लेखनीय मते मिळवली होती. प्रभागातील त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि सामाजिक कार्याचा प्रभाव पाहता त्यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाला मोठी राजकीय ताकद मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे.

यावेळी ओंकार फडके, संदीप सुर्वे यांच्यासह शेकडो भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!