मुख्य बातमी
देव, घैसास, कीर महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय एकता दिवस

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.
प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन केले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रमाधिकारी प्रा. मिथिला वाडेकर यांनी प्रास्ताविकात राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्याचा उद्देश सांगितला. त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी एकता शपथ घेतली. कार्यक्रमाला कला शाखाप्रमुख प्रा. ऋतुजा भोवड, सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. स्मार्था कीर यांनी केले.



