आबलोलीचे पत्रकार संदेश कदम राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित

गुहागर : दिशा महाराष्ट्राची या संस्थेच्या चौथ्या वर्धापन आयोजित कार्यक्रमात गुहागर तालुक्यातील आबलोली गावचे सुपुत्र आणि पत्रकार संदेश तुकाराम कदम यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
“दिशा महाराष्ट्राची”चे तुषार गौतम नेवरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच संपादक , साहित्यिक आणि कवी सरकार इंगळी यांच्या हस्ते सन्मानपत्र तसेच आकर्षक ट्रॉफी देऊन संदेश कदम यांचा गौरव करण्यात आला. याच सन्मान सोहळ्यात “दिशा महाराष्ट्राची”चे गुहागर तालुका प्रतिनीधी म्हणून पत्रकार संदेश कदम यांना कार्यक्रमाच्या अध्यक्षा, आदर्श प्राचार्य आणि सुप्रसिद्ध निवेदिका अर्चना मोहिते यांच्या हस्ते नियुक्ती पत्र आणि ओळखपत्र देण्यात आले.

“संदेश तुकाराम कदम आपण गेली अनेक वर्ष आपल्या अंगी असलेल्या कलागुणांनी समाजातील विविध विषयांवर आजतगायत आपण कार्य करत आहात याचा “दिशा महाराष्ट्राची” या वाहिनीस सार्थ अभिमान वाटतो. आपली आपल्या कामाविषयी असलेली निष्ठा, प्रामाणिकता व तळमळ ही समाजातील अनेक व्यक्तिमत्वांना प्रेरित करणारी आहे. आपली कार्यक्षमता व कर्तव्य दक्षता घेऊन रविवार, २३ नोव्हेंबर २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता भवन सानपाडा, नवी मुंबई येथे आपणास आदरपूर्वक सन्मानीत करत आहोत. आपले अभिनंदन आणि भविष्यकालीन वाटचालीस मंगलमय शुभेच्छा” अशा प्रकारचे सन्मानपत्र संदेश कदम यांना देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सपना नेवरेकर यांनी केले.



