आम्ही शेतकरी- कृषीमुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

देवरूख येथे संगमेश्वर तालुका एकदिवसीय शेतकरी कार्यशाळा उत्साहात

संगमेश्वर : तालुका कृषी विभाग, पंचायत समिती (संगमेश्वर), कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा (रत्नागिरी) व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “सत्यमेव जयते फार्मर कप २०२६” संगमेश्वर तालुका एकदिवसीय शेतकरी कार्यशाळा छ. संभाजी महाराज सभागृह पंचायत समिती देवरुख येथे झाली.

यावेळी तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे, पाणी फाउंडेशनचे तज्ञ प्रशिक्षक संदेश कारंडे, सुहास मोहिते, लाहूराज दरेकर, विकास कळमकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांनी केले. त्यानंतर पाणी फाउंडेशनच्या सर्व प्रशिक्षकांनी फार्मर कप संकल्पना, सहभागी होण्याची पद्धती, शेतकरी गट निवड, तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

त्यानंतर तीन दिवसीय निवासी प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांची नोंदणी करून घेण्यात आली. यावेळी उप कृषी अधिकारी पोपट खंडागळे यांनी सर्व शेतकऱ्यांना महाविस्तार एआय ॲप संदर्भात माहिती दिली व उपस्थित सर्व शेतकऱ्यांना ॲप डाऊनलोड करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती धस यांनी केले. यावेळी सर्व मंडळ कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी, पत्रकार प्रतिनिधी आणि शेतकरी तसेच ‘माविम’च्या गटांच्या महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!