मुख्य बातमी

गणेशगुळेतील गणेश मंदिरात माघी गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

गावखडी : रत्नागिरीत तालुक्यातील श्री क्षेत्र स्वयंभू गणेशमंदिर गणेशगुळे येथे माघी गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

१९ ते २२ जानेवारी दरम्यान दररोज सकाळी ६.३० वाजता विधिवत गणेश पूजन, अभिषेक, मंत्रपुष्पांजली, सकाळी ८ वाजता आणि, सायंकाळी ६ वाजता आरती होईल. १९ रोजी सायंकाळी ७ वाजता ढोलवादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे बक्षीस वितरण लगेचच ९.३० वाजता केले जाईल. त्यानंतर १० वाजता अक्षय थिएटर्सतर्फे (रत्नागिरी) “इम्युनिटी” (द व्हाईस आफ डाॅलरन्स) हे नाटक सादर केले जाईल.

२० रोजी रात्री १० वाजता अजिंक्यतारा थिएटर्सचे (गणेशगुळे) “साई माझी माय माऊली” हे नाटक सादर केले जाईल. २१ रोजी  दुपारी १ वाजता श्री सोमेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे (भडे) अशोक सुर्वेबुवा यांचे भजन होईल. दुपारी २ ते ५ या वेळेत महिलांचे हळदी-कुंकू व अधिरा अक्षय गुरव, आयांश अभिनव गुरव यांच्याकडून लाडू वाटप केले जाईल. दुपारी ३ वाजता विठ्ठल रखूमाई भजन मंडळ (कुवारबाव) यांचे भजन सायंकाळी ७ वाजता बुवा किरण कीर (नांतुडे) यांचे भजन होईल.  रात्री १० वाजता तोडणकर ऐक्यवर्धक नाट्य मंडळ (मुंबई) यांचे “वाडा चिरेबंदी” हे नाटक होईल.

२२ रोजी सकाळी ९ वाजता हदय आत्माराम लाड व रामचंद्र पांडुरंग बांगर यांच्याकडून सरबत वाटप, ११ ते १२ यावेळेत कीर्तनकार हभप उल्हास लाड (कसोप) यांचे जन्मोत्सव कीर्तन होईल. दुपारी १२ वाजता श्रींची पालखी मिरवणूक, १२ ते ३ यावेळेत हदय आत्माराम लाड व रामचंद्र पांडुरंग बांगर यांच्याकडून महाप्रसादाचे वाटप केले जाईल.

सार्थक प्रज्योत गुळेकर यांच्याकडून लाडू वाटप, अजय यशवंत नागवेकर यांच्याकडून पाणी वाटप होईल. दुपारी १ वाजता बुवा दामोदर लोकरे (मुंबई) यांचे भजन, दुपारी ३ वाजता काडसिद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे (गणेशगुळे) बुवा संदेश तोडणकर यांचे भजन होईल. रात्री ९ वाजता देणगीदार, नाटककार यांचे आभार प्रदर्शन व क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण केले जाईल. रात्री १० वाजता प्र. ल. मयेकर लिखित दोन अंकी ज्वलंत शोकांतिका नाटक “वास्तव” लाड ऐक्यवर्धक नाट्य मंडळ (मुंबई) सादर करेल.

या विविध कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री क्षेत्र स्वयंभू गणेशमंदिर गणेशगुळेचे अध्यक्ष प्रसाद सुनील तोडणकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!