मुख्य बातमी
कामवाटप समिती सभा १६ डिसेंबर रोजी

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाअंतर्गत सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्था यांच्याकरिता कामवाटप समितीची सभा १६ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा परिषदेच्या कै. शामराव पेजे सभागृहामध्ये होणार आहे. या समिती सभेमध्ये १० लाख रुपयांच्या आतील कामांचे वाटप होणार आहे.
सभेमध्ये जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्था, सुशिक्षित बेरोजगार अभियंता (विद्युत), सुशिक्षित बेरोजगार अभियंता (स्थापत्य) यांच्या कामाचे वाटप होणार आहे. संबंधितांनी या सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन कामवाटप समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.



