मुख्य बातमी

कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरात व्यावसायिक शिक्षण कार्यशाळा

रत्नागिरी : शिक्षणासोबत व्यावसायिक शिक्षण ही काळाची गरज ओळखून लहानपणापासून विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षणाचे ज्ञान होण्यासाठी प्राथमिक विद्यामंदिरात व्यावसायिक शिक्षण कार्यशाळेचे आयोजन मुख्याध्यापिका सौ. राजवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

या कार्यशाळेसाठी रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथील निनाद जोशी आणि सौ. स्नेहा जोशी हे मार्गदर्शक म्हणून लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना अगरबत्ती कशी बनवतात याचे प्रत्यक्ष दाखवले. यासाठी त्यांनी व्हिडीओ क्लिपचा प्रभावीपणे वापर केला. अनेक विद्यार्थ्यांनी शंका विचारल्या. त्या शंकांचे निरसन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांनी उद्योजक श्री. व सौ. जोशी भारावून गेले. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून सर्व विद्यार्थ्यांना अगरबत्तीचे मोफत वाटप केले.

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. राजवाडे यांनी श्री. निनाद जोशी आणि सौ.स्नेहा जोशी यांचे शाल, श्रीफळ व पुष्प देऊन आभार मानले. सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!