अनिल कांबळे यांची जयगड ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी निवड

रत्नागिरी : तालुक्यातील ग्रामपंचायत जयगडतर्फे आज (३० सप्टेंबर) रोजी आयोजित ग्रामसभेमध्ये जयगडचे ज्येष्ठ शिवसैनिक अनिल बाळू कांबळे यांची महात्मा गांधी तंटामुक्त समिती जयगड अध्यक्षपदी एकमताने व बिनविरोध निवड झाली. तर रवींद्र पांडुरंग पोटफोडे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.
अनिल कांबळे हे ज्येष्ठ शिवसैनिक असून एक निर्भीड व न्यायप्रिय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. या पदावर गेले दोन वर्ष सलग जयगडचे ज्येष्ठ शिवसैनिक व पेठवाडीचे सामाजिक नेते कमलाकर बोरकर हे कार्यरत होते. त्यांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर आता श्री. कांबळे यांच्यावर या पदाची धुरा सर्व ग्रामस्थांनी एकमताने सोपवली आहे. जयगड परिसरातून याबद्दल श्री. कांबळे यांचे जोरदार अभिनंदन करण्यात येत आहे.
सन २०२६-२७ या कालखंडासाठी ही नियुक्ती असून, श्री. अनिल कांबळे यांच्यासोबत पुढील प्रमाणे कार्यकारणी आहे. श्रीयुत प्रसाद वामन गुरव हे पदसिद्ध निमंत्रक असून ते जयगड चे प्रभारी पोलीस पाटील आहेत. तसेच ज्येष्ठ शिवसैनिक सर्वश्री अनिरुद्ध कमलाकर साळवी (माजी सरपंच) प्रमोद प्रभाकर घाटगे, साईराज किशोर धुंदुर, सौ. अक्षदा देवरुखकर, जितेंद्र रोहिदास पारकर, देवदास गणपत चव्हाण, सत्यविजय आत्माराम खाडे, विकास कमलाकर निंबाळकर, श्रीमती शिल्पा रूपसेन मेस्त्री, फारुख हुसेन संसारे, मुकद्दर नंदकुमार खाडे, सौ. सविता नयन खाडे, समीर विष्णू मयेकर, कमलाकर महादेव बोरकर, निलेश रमाकांत घाटगे,प्रमोद विठ्ठल झगडे, मा. मुख्याध्यापक, मा. बीट अंमलदार जयगड सागरी पोलीस ठाणे, वीज वितरण कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी एस. जी. कुळ्ये, तलाठी जयगड कुमारी श्रद्धा दैत, डॉ. संकेत अरुण संसारे आदी मान्यवर मंडळी आहेत. नवीन तंटामुक्त समितीला जयगड चे ग्रामपंचायत प्रशासक अक्षय शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व शुभेच्छा दिल्या.



