मुख्य बातमी

२२ जानेवारीपासून ‘श्री रत्नागिरीचा महागणपती’ माघी गणेशोत्सव 

महिलांसाठी हळदीकुंकू आणि ''पैठणी सम्राज्ञी २०२६” खेळ : युवकांसाठी खास ‘’महागणपती रिल’’ स्पर्धा

रत्नागिरी : धार्मिक आणि सामाजिक अधिष्ठान असलेल्या सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळ, रत्नागिरी यांच्या वतीने ‘श्री रत्नागिरीचा महागणपती’ माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यानिमित्त २२ जानेवारी ते २८ जानेवारी या कालावधीत उत्सवात दररोज धार्मिक विधी, भजन-कीर्तन, सामाजिक उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

या माघी गणेशोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे. यंदा उत्सवाची सुरुवात २२ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता श्रींच्या विधी विधिवत प्राणप्रतिष्ठापनेने होणार आहे. रात्री ८ वाजता बुवा उदय मेस्त्री आणि श्री स्वामी समर्थ प्रसादिक भजन मंडळ, केळ्ये यांच्या सुमधुर भजनांनी वातावरण भक्तिमय होणार आहे.

२३ जानेवारी रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा असून संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत महिलांसाठी हळदीकुंकू व तीर्थप्रसादाचे आयोजन केले असून रात्री ८ वा. बुवा गौरव पांचाळ व साई प्रसादिक भजन मंडळ, फुणगूस (ता. संगमेश्वर) यांच्या भजनसेवेचा लाभ भाविकांना मिळणार आहे.

२४ जानेवारी रोजी कृ. चि. आगाशे प्राथमिक विद्यामंदिर येथील विद्यार्थ्यांचे सकाळी ९ वा. अथर्वशीर्ष पठण तर सायंकाळी ७ वा. हभप प्रवीण मुळ्ये यांचे “गणेश पुराण सार” या विषयावर कीर्तन होईल. २५ जानेवारी सकाळी ८ वा. मंडळातर्फे सांबरे हॉस्पिटलच्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. तर सायंकाळी ७ वा. खास महिलांसाठी ”पैठणी सम्राज्ञी २०२६” हा पारंपरिक खेळ होईल. मानाची पैठणी तसेच सरप्राईझ बक्षिसे देण्यात येणार आहेत.

२६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सकाळी ८ ते ११ या कालावधीत जिलेबी वाटप व रक्तदान शिबिर होईल, तर संध्याकाळी ७ वा. ‘स्वरसमर्पण’ हा भक्तिपर व देशभक्तीपर गीतांचा विशेष कार्यक्रम होणार आहे. स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या काही गीतांचाही यात समावेश करण्यात येणार आहे.

२७ जानेवारी या दिवशी सकाळपासून धार्मिक कार्यक्रम सुरू राहणार आहेत. सकाळी ७ वा. जीजीपीएस गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे अथर्वशीर्ष पठण होणार आहे. सकाळी १० वा. बुवा साहिल सावंत व सोमेश्वर प्रासादिक भजन मंडळ उक्षी यांचे भजन, तर दुपारी १२ वा. महाप्रसादाचे वाटप होईल. सायंकाळी ७ वा. महाआरती होणार असून, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. तसेच बुवा उमेश लिंगायत, हरिनाम भजन मंडळ, संगमेश्वर भजन सेवा सादर करणार आहेत. त्यानंतर विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांचे पारितोषिक वितरण होईल. उत्सवाची सांगता २८ जानेवारी सायंकाळी ४ वाजल्यापासून श्रींच्या भव्य विसर्जन मिरवणुकीने होईल.

या महाउत्सवाच्या निमित्ताने भक्तांसाठी दररोज लकी ड्रॉ निघणार असून उत्सव काळात दररोज संध्याकाळी विजेते जाहीर केले जातील. २२ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान रील स्पर्धा घेतली जाणार आहे. ”एक दिवस महागणपती सोबत” आणि ”माझी एक चांगली सवय महागणपतीसाठी” असे विषय देण्यात आले आहेत. याचे बक्षीस वितरण २७ जानेवारीरोजी होणार आहे. या स्पर्धांबाबत आणि लकी ड्रॉ बाबत लवकरच सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.

सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळ, रत्नागिरी यांच्या वतीने ”श्री रत्नागिरीचा महागणपती” च्या दर्शनासाठी भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या वेळी मंडळाचे अध्यक्ष योगेश मगदूम, उपाध्यक्ष सौ. अनुष्का शेलार, सचिव प्रवीण लिंगायत, सहसचिव अनघा निकम मगदूम, खजिनदार अमोल देसाई यांच्यासह मनोज घडशी सल्लागार तसेच अमित देसाई, अश्विनी देसाई, प्रियल जोशी, राहुल भाटकर, निखिल शेट्ये, रोहित भुजबळराव, रामदास शेलटकर, अजय लिंगायत राजेश झगडे, साईनाथ सावंत, अमृत गोरे, श्रीनाथ सावंत, सागर सोलकर, अभिलाष कारेकर, सतीश लिंगायत, ययाती शिवलकर, कृष्णा पाटील, विशाल कांबळे, रुद्र भोळे, नितीन पवार, दुर्गेश पिलणकर, सिद्धेश धुळप, सौ. प्रणाली धुळप, प्रणव सुर्वे, उद्देश लाड, अंकुर मोहिते, ओमकार आंग्रे, योगेश साळवी, रतिकेश खानविलकर, ऋषिकेश पाटील, राज भातडे, शिवाजी कारेकर, प्रताप भानुशाली, शोएब खान, संदेश लिंगायत, संतोष पवार, अरुण माने यांचा या उत्सवात प्रामुख्याने सहभाग आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!