विज्ञान प्रदर्शनात चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यायाचा दबदबा कायम

आबलोली (संदेश कदम) : ५३ वे गुहागर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन नुकतेच न्यू इंग्लिश स्कूल पाटपन्हाळे येथे उत्साहात संपन्न झाले. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गुहागर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपला दबदबा कायम राखला आहे.
प्रदर्शनात गुहागर तालुक्यातील आबलोली येथील चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली या विद्यालयाचे विद्यार्थी वल्लभ महेंद्र ठाकूर याने दिव्यांग गटातून प्राथमिकमध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर दिव्यांग गट माध्यमिक मधून कुमार नीरज पवार त्याने तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला असून रुद्र राकेश साळवी, शौर्य नरेश पावसकर या विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक प्रतिकृती माध्यमिक गटातून उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक वैभव ढवळ यांचे लोक शिक्षण मंडळ आबलोली या संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत बाईत, कार्याध्यक्ष सचिन बाईत, मुख्याध्यापक डी. डी. गिरी, शाळा व्यवस्थापन कमिटी व अधिकारी आणि सदस्य तसेच शिक्षक कर्मचारी यांच्यासह आबलोली पंचक्रोशीतून विविध सामाजिक, धार्मिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.



