क्रीडामुख्य बातमी

चॅम्पियन रेनी ट्रॉफीमध्ये उद्या रंगणार सुपर फायटर्स व सुपर वॉरियार्समध्ये प्रदर्शनीय सामना

रत्नागिरी : चॅम्पियन रेनी ट्रॉफीमध्ये उद्या (१५ ऑगस्ट) सुपर फायटर्स व सुपर वॉरियार्स या दोन संघांमध्ये प्रदर्शनीय सामना रंगणार असून, हा सामना दुपारी ३ वाजता शहरातील आठवडा बाजार येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे होणार आहे. कितीही पाऊस असला तरी हा सामना रंगणार आहे.

प्रतीक साळवी व विराज साळवी यांच्या नेतृत्वाखाली या सामन्यात जुन्या व नवीन खेळाडूचा समावेश असणार आहे. जुना अष्टपैलू डावखुरा खेळाडू प्रवीण साळवी, एकेकाळचा फलंदाजाचा कर्दनकाळ कुणाल सावंत, मनीष आयरे, राज चव्हाण, रजनीश परब व नवीन दमाचे अभी दुडे, दीपक माणगावकर, तेजस हळदवणेकर, यश खानविलकर आणि विभास दाभाडे असा नव्या जुन्याचा समावेश या दोन्ही संघात असणार आहे. त्यामुळे नवीन खेळाडूंचा जुन्या खेळाडूंपुढे कसा कस लागतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

रत्नागिरीतील क्रिकेटप्रेमींनाही उत्सुकता असणार आहे ती मनीषची बॅट पुन्हा तळपणार का? कुणाल सावंत पुन्हा एकदा गोलंदाजी आग ओकणार का? तसेच या सामन्यात न्यू प्रेसिडेंसीचा यष्टीरक्षक रजनीश पुन्हा यष्टीरक्षण करताना दिसेल का? अभि दुडये मैदानात नवीन खेळाडूंना घेऊन कोणता प्लॅन आखणार.

हा सामना पाहण्यासाठी रत्नागिरीतील सर्व क्रिकेटप्रेमींनी प्रमोद महाजन संकुल येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

संघ पुढीप्रमाणे – सुपर फायटर्स संघ : प्रतीक साळवी (कर्णधार/ऑल राउंडर), अभी दुडे (ऑल राउंडर), प्रवीण साळवी (ऑल राउंडर), रोहित मायनांक (बॉलर), शुभम सावंत (बॉलर), कुणाल सावंत (बॉलर), प्रथमेश साळवी, लोभस देसाई, सर्वेश शेलार, किरण कामतेकर, दीपक माणगावकर, महेश सामंत.

सुपर वॉरियर्स संघ : विराज साळवी (कर्णधार/ऑल राउंडर), तेजस हळदवणेकर (ऑल राउंडर), सुजित साळवी (बॅटर), सौरभ झापडेकर (बॅटर), शुभम सावंत (बॉलर), राज चव्हाण (ऑल राउंडर), मनीष आयरे (बॅटर), विभास दाभाडे, विराज दाभाडे, आराध्य वर्तक, यश खानविलकर (बॉलर), ⁠रजनीश परब.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!