रत्नागिरीत भीमा कोरेगाव विजयदिनाचे व थिबाराजा जयंतीचे आयोजन

रत्नागिरी : येथील थिबा राजा कालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समितीच्या वतीने १ जानेवारी २०२६ रोजी थिबा राजा यांची जयंती आणि भीमा कोरेगाव विजय दिन साजरा करण्यात येणार आहे.
यानिमित्त सकाळी १०.३० वाजता शिवाजीनगर रत्नागिरी येथील थिबा राजा यांच्या समाधी स्थळी पुष्प अर्पण केले जाणार आहे. ११ वाजता डीएसपी बंगल्याशेजारील थिबा राजा कालीन बुद्धविहार येथे बुद्ध वंदना घेणे, त्यानंतर ११.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भीमा कोरेगाव विजयस्तंभ प्रतिकृतीस अभिवादन आणि बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला जाणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयाशेजारील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनात अभिवादन सभा होणार आहे.
हा कार्यक्रम सर्व भारतीय नागरिकांचा असून यावेळी जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन थिबा राजा कालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समितीने केले आहे.



