मुख्य बातमी

रत्नागिरी पोलीस दलातर्फे “मिशन जीवन” अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचा अनोखा वाढदिवस साजरा

रत्नागिरी : जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या संकल्पनेतून जिल्हा पोलीस दलाच्या “मिशन जीवन” अंतर्गत लांजा व संगमेश्वर येथील सर्व जेष्ठ नागरिकांचा अनोखा वाढदिवस १ जानेवारी रोजी साजरा करण्यात आला.

यासाठी लांजा व संगमेश्वर पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या व ज्यांचा वाढदिवस १ जानेवारी असणाऱ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना निमंत्रित केले होते. “मिशन जीवन” अंतर्गत हा वाढदिवस कार्यक्रम वेरळ व गवाणे लांजा या गावातील सभागृहामध्ये व आंबेड खुर्द-संगमेश्वर येथील सभागृहामध्ये घेण्यात आला. या वाढदिवस कार्यक्रमासाठी लांजा पोलीस ठाणे हद्दीमधील १७७ जेष्ठ नागरिक व संगमेश्वर पोलीस ठाणे हद्दीमधील ३०० ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

या विशेष प्रसंगी उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सर्वांना गुलाब पुष्प देऊन व केक कापून करण्यात एकत्रित रित्या साजरा करण्यात आला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, लांजाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे, लांजा पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजाराम चव्हाण, संगमेश्वर पोलीस ठाणे, पोलीस पाटील, पोलीस अंमलदार, होम गार्ड्स व नागरिक उपस्थित होते.

या तीनही कार्यक्रम प्रसंगी उपस्थित सर्व जेष्ठ नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त केले व आपल्या भावना व्यक्त करताना अशा प्रकारचा कार्यक्रम रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रथमच झाल्याचे सांगितले. तसेच असे कार्यक्रम रत्नागिरी पोलीस दलातर्फे वारंवार घेण्याची इच्छा व्यक्त केल्या. या कार्यक्रमामुळे अनेक जेष्ठ नागरिकांनी आपल्याला पोलीसरुपी आधार मिळाल्याचे देखील सांगीतले.

दरम्यान, पोलीस अधीक्षक श्री. बगाटे यांनी सर्वांना या “मिशन जीवन” चा लाभ घेण्याबाबत सांगितले. सर्वांच्या अडी-अडचणीं ऐकून घेऊन निरसन करून जिल्हा पोलीस दलाचे सदैव सहकार्य राहणार असल्याचे प्रतिपादन केले.

या कार्यकमादरम्यान वेरळ-लांजा या गावातील शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या आजी-आजोबा यांचे पद पाण्याने धुऊन व आशीर्वाद घेऊन समाजात आपले आजी-आजोबांबाबत सकारात्मक संदेश दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!