मुख्य बातमी

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलासाठी फॉरेन्सिक तज्ञासह मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध

रत्नागिरी : भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कायद्याच्या अंमलबजावणीकरीता महाराष्ट्र शासन, गृह विभागामार्फत मोबाईल फॉरेन्सिक प्रकल्पाअंतर्गत रत्नागिरी जिल्हयाकरीता एक अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन फॉरेन्सिक तज्ञासह उपलब्ध झालेली आहे.

या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते १ सप्टेंबर रोजी करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, पोलीस उप-अधीक्षक (गृह) श्रीमती राधिका फडके, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा नितीन ढेरे व इतर अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

गुन्हयाचे घटनास्थळ संरक्षित करणे व त्यानंतर घटनास्थळावरील भौतिक, रासायनिक, जैविक व डिजीटल पुरावे गोळा करण्यासाठी या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचा वापर करण्यात येणार असून संपूर्ण प्रक्रीयेत ब्लॉकचैन यंत्रणेचा उपयोग करण्यात येणार आहे.

या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये भौतिक, रासायनिक, जैविक व डिजिटल पुरावे गोळा करण्यासाठी अत्याधुनिक किट्स, रसायने व साधनसामुग्री उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमुळे गुन्ह्याची उकल करणे, आरोपीविरूध्द जास्तीत जास्त पुरावे गोळा करून ते न्यायालयात सादर करणे अधिक सोईस्कर होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त गुन्हेगारांना शिक्षा होऊन पिडीतांना न्याय मिळण्यासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपयुक्त ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!