Uncategorized

आई-वडिलांच्या कष्टाचं जाणलं मोल; रिया दणदणे हिची दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल कामगिरी

गुहागर : बदलती शिक्षण व्यवस्था पालकांसह विध्यार्थ्यांना मोठे आव्हान निर्माण करीत आहे, दहावी उत्तीर्ण होणे ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण पायरी समजली जाते, पुढे हीच पायरी विद्यार्थ्यांना भविष्यातील स्वप्नांकडे नेणारा दिशादर्शक मार्ग ठरतो, गुहागर तालुक्यातील निवोशी (दणदणेवाडी) येथील काबाडकष्ट करणाऱ्या कुटुंबातील मुलीने प्रतिकूल परिस्थितीतही दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. रयत शिक्षण संस्थेचे श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालय पालशेत या शाळेची विद्यार्थ्यांनी रिया रघुनाथ दणदणे ही दहावीच्या परीक्षेत ८४ टक्के गुण मिळवत आपल्या पालकांच्या कष्टाचे सार्थक केले. घरची परिस्थिती बेताची वडील मुबंईत रोजनदारीवर कामाला असून आई रूपाली आपल्या दोन लेकरांसह गावीच राहत शेती व मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत आहे.

रियाने आपल्या पालकांच्या कष्टाचे चीज करण्याचे स्वप्न उराशी बाळगून, बिकट परिस्थितीशी दोन हात करीत नियमित अभ्यास व जिद्द चिकाटीच्या जोरावर दहावीच्या परीक्षेत केलेल्या उज्ज्वल कामगिरीचे प्रतिबिंब दहावीच्या निकालातून मंगळवारी दिसले. हे यश तिच्या मेहनतीचे आहेच; मात्र तिच्या आई वडिलांनी केलेल्या त्याग, अथक परिश्रम व पाठिंबा आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे फलित आहे.

आपल्या यशात आई- वडील, मामा-मामी, शिक्षक यांचा मोठा वाटा असल्याचे रियाने सांगितले. भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात करियर करण्याचे तिचे स्वप्न आहे. रियाने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन सह कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!