क्रीडामुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

“एक समाज एक संघ, समाज एकता मनसे चषक २०२५” या स्पर्धेत ‘स्वराज्य रक्षक’ संघ विजेता

आबलोली (संदेश कदम) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा क्षेत्राचे संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी शृंगारतळी येथे आयोजित केलेल्या “एक समाज एक संघ”, “समाज एकता मनसे चषक २०२५” या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी गुहागर तालुका क्षत्रिय मराठा समाजाच्या “स्वराज्य रक्षक या संघाने मुस्लिम समाजाच्या “आझाद फायटर्स” या दोन संघाच्या अटी-तटीच्या सामन्यात मराठा समाजाचा “स्वराज्य रक्षक संघ” विजयी झाला.

त्यानंतर या दोन्ही संघाच्या खेळाडूंनी एकत्र येऊन गळाभेट घेऊन फोटो काढले आणि “हम सब एक है” म्हणत एकीचे दर्शन दाखवून दिले. यावेळी उपस्थितांकडूनही टाळ्यांचा कडकडाट झाला आणि या दोन्ही समाजाच्या खेळाडूंकडून “समाज एकता मनसे चषक स्पर्धेचा” एक समाज एक संघ” हे दिसून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!