रत्नदुर्ग किल्ल्यावर श्री भगवती देवी मंदिरात हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन

रत्नागिरी : रत्नागिरीतील ऐतिहासिक रत्नदुर्ग किल्ल्यावर असलेल्या श्री भगवती देवी मंदिरात सालाबादप्रमाणे मकर संक्रांतीचे औचित्य साधून हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा समारंभ शुक्रवारी (१६ जानेवारी) रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत श्री देवी भगवती मंदिर, किल्ला रत्नदुर्ग किल्ला येथे होणार आहे.
या धार्मिक व सांस्कृतिक समारंभात परिसरातील तसेच रत्नागिरी शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री भगवती देवी पब्लिक ट्रस्टचे अध्यक्ष यांनी केले आहे. मकर संक्रांतीनिमित्त आयोजित होणारा हा हळदी-कुंकू समारंभ महिलांसाठी भक्तीभाव व आनंदाचे केंद्र ठरणार असून परंपरेचे जतन करणारा उपक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
सर्व महिलांनी या हळदी-कुंकू समारंभाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.



