मुख्य बातमी

पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राइकचा खेडमध्ये आनंद

खेड : भारताने आज पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करून क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा आनंद खेडवासियांना फटाके वाजवून आणि पेढे वाटून साजरा केला.

२२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी वादी हल्ला करत २७ निष्पाप लोकांचा बळी घेतला होता. या हल्ल्याचा बदला आज घेण्यात आला. ज्याप्रमाणे भारतीय महिलांचे सिंदूर मिटवण्यात आला. त्याचे चोख प्रत्युत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर राबवून दिले.

 

पाकिस्तानला पूर्ण धडा शिकवण्याचा विडा भारतीय सरकारने उचललेला आहे. त्याला पूर्ण पाठिंबा देण्यासाठी समस्त खेडवासीयांच्या वतीने आज फटाके फोडून आणि पेढे भरवून या हल्ल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी खेडचे माजी नगराध्यक्ष आणि मनसेचे कोकणचे नेते वैभव खेडेकर यांच्यासोबत शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे, नंदू साळवी, स्वप्नील सैतावडेकर, आकाश पिंपळकर, पियुष माने, प्रशांत बारटक्के, अतुल शेठ, राकेश मोरे, भूषण कारेकर, अक्षय जांभुळकर, संजय आखाडे आणि समस्त खेडवासिय उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!