कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबईच्या वतीने माजी विद्यार्थ्यांच्या सत्कार

रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे ग्रामस्थ मंडळ, मुंबई संचलित श्री. वि. प. कोतवडे इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी सोहम मंगेश धावडे याची भारतीय सैन्य दलामध्ये निवड झाल्याबद्दल, तसेच मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले शाळेचे माजी विद्यार्थी पराग चंद्रकांत पिळणकर यांचा कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबईचे उपाध्यक्ष संजय मयेकर, शाळेचे मुख्याध्यापक प्रेमदास पवार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

कोतवडे सारख्या ग्रामीण भागामध्ये असलेल्या शाळेच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असून आजवर शाळेने विद्यार्थी हिताच्या उपक्रमांचे फलित दिसू लागल्याचे समाधान शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रेमदास पवार यांनी व्यक्त केले त्याचप्रमाणे शाळेतील इतर विद्यार्थ्यांनी देखील यांचा आदर्श घ्यावा. देश सेवेसाठी व समाजसेवेसाठी तत्पर राहावे अशा प्रकारचे मनोगत यावेळी व्यक्त करण्यात आले.



