मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

गुहागरमध्ये नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल 

गुहागर नगरपंचायतीसाठी पाच दिवसांनंतर पहिला उमेदवारी अर्ज सादर

गुहागर : नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात झाली; मात्र गेल्या चार दिवसांमध्ये एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. आज (१४ नोव्हेंबर) ॲड. सुप्रिया सुरेश वाघधरे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज गुहागर नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी (गुहागर) परीक्षित पाटील यांच्याकडे दाखल केला. ॲड. वाघधरे यांच्या रूपाने आज पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला.

सुप्रिया वाघधरे या पेशाने वकील असून, २०१५ पासून त्या समाजसेवेत सक्रिय असून, तसेच सामाजिक क्षेत्रातही अग्रेसर आहेत. आज त्यांनी सर्वप्रथम अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करून प्रबळ राजकीय पक्षांना मोठा अनपेक्षित धक्का दिला आहे. ॲड. सुप्रिया वाघधरे यांच्या उमेदवारीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

या उमेदवारी अर्ज मुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असून, त्यांनी निवडणुकीला सामोरे जायची तयारीही केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!