मुख्य बातमी

जनता सहकारी बँकेच्या शिवाजीनगर-रत्नागिरी शाखेच्या नूतनीकृत वास्तूचे २९ मे रोजी उद्घाटन

रत्नागिरी : जनता सहकारी बँक लि., पुणे या मल्टिस्टेट शेड्युल्ड बँकेची गौरवशाली ७६ वर्षे पूर्ण झाली असून, ग्राहकांना अधिक आधुनिक, सुसज्ज आणि दर्जेदार बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शिवाजीनगर, रत्नागिरी शाखेचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या नूतनीकृत वास्तूचे उद्घाटन शुक्रवार, दि. २९ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

‘सहकार्यं यशोधनम्’ या ब्रीदवाक्याला अनुसरून जनता सहकारी बँक लि., पुणे ही संस्था गेली ७६ वर्षे ग्राहक सेवा, विश्वासार्हता आणि प्रगत बँकिंग सेवेमुळे बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य राहिली आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिक विकासातही बँकेचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. शिवाजीनगर शाखेच्या नूतनीकरणामुळे ग्राहकांना अधिक प्रशस्त, आधुनिक आणि तंत्रज्ञानयुक्त सुविधा उपलब्ध होणार आहेत.

या उद्घाटन सोहळ्यास नवलाई ग्रुपचे संचालक जितेंद्र विनायक सावंत तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हा कार्यवाह गजानन विष्णू करमरकर प्रमुख उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तसेच बँकेचे पदाधिकारी, संचालक मंडळ सदस्य, अधिकारी, कर्मचारी, सभासद, ग्राहक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमानंतर सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व सभासद, ग्राहक आणि नागरिकांनी नूतनीकृत शाखेच्या उद्घाटन समारंभास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!