खेड पालिकेचे गटनेते रहीम सहिबोले यांच्या दालनाचे उद्घाटन उत्साहात

खेड : भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक तथा गटनेते रहीम सहिबोले यांच्या नगरपालिकेतील नवीन दालनाचे उद्घाटन भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र (नंदू) साळवी, भाजपा रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, नगरसेविकास वैभवी वैभव खेडेकर, नगरसेविका स्वप्नाली राकेश चव्हाण, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद नांदगावकर, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, माजी नगराध्यक्ष उर्मिला शेट्ये-पाटणे, भाजपा महिला मोर्चा खेड शहराध्यक्ष उपाध्यक्ष प्रीती चिखले, भाजपा अल्पसंख्याक सेल खेड शहर अध्यक्ष नईम चौगुले, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, अक्षय सनगरे, प्रदीप भोसले यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



