मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा
कसबा जिल्हा परिषद गटात शिंदे सेनेला धक्का
पारंपरिक सत्ता उलथवत ठाकरे शिवसेनेच्या नवख्या विशाखा कुवळेकर विजयी

संगमेश्वर : कसबा जिल्हा परिषद गटातून प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या विशाखा विजय कुवळेकर यांनी प्रभावी कामगिरी करत विजय मिळवला. ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार म्हणून त्यांनी पारंपरिक शिंदे सेनेला मोठा धक्का देत अनेक वर्षांपासून असलेली एकहाती सत्ता मोडीत काढली. नवख्या उमेदवाराने मिळवलेल्या या दणदणीत यशामुळे कसबा गटाच्या राजकीय समीकरणात मोठा बदल झाल्याचे चित्र आहे.
विजय घोषित झाल्यानंतर सौ. कुवळेकर यांनी मतदारांचे आभार मानले. निवडणूक काळात दिलेले प्रत्येक आश्वासन सर्वांना सोबत घेऊन पूर्ण करून दाखवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
विकासकामांना प्राधान्य देताना कोणत्याही परिस्थितीत राजकारण केले जाणार नाही, असे त्या म्हणाल्या.



