मुख्य बातमी

विभागीय स्तरावरील डाक अदालत २५ मार्चला

रत्नागिरी : अधीक्षक डाकघर, विभागीय कार्यालयाच्या वतीने २५ मार्च रोजी अधीक्षक डाकघर कार्यालय, गोगटे जोगळेकर कॉलेज शेजारी येथे सकाळी ११ वाजता विभागीय स्तरावरील डाक अदालत आयोजित केली आहे.

पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल. अशा तक्रारींची डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, डाक वस्तु, पार्सल, बचत बँक व मनीऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील.

एका व्यक्तीने एकच तक्रार अर्ज करावा, तक्रारीचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. डाक सेवेबाबतची आपली तक्रार अधीक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, रत्नागिरी ४१५६१२ यांच्या नावे दिनांक २१ मार्चपर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल, अशा बेताने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!