मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

धोपावे ग्रामविकास मंडळाची (मुंबई) वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

विद्यार्थी गुणगौरव, महिला गौरव सोहळा उत्साहात

आबलोली (संदेश कदम) : धोपावे ग्रामविकास मंडळाची मुंबई (रजि.) वार्षिक सर्वसाधारण सभा मंडळाचे अध्यक्ष अनिल लक्ष्मण चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि धोपावे श्री हनुमान मंदिर विश्वस्त अध्यक्ष विलास यशवंत निंबकर यांच्या उपस्थितीत कृष्णा जैजुरकर क्लासेस, पर्ल सेनापती बापट मार्ग दादर ( पश्चिम ) येथे  झाली.

प्रारंभी मान्यवर विलास निंबकर, अनिल चव्हाण, वामन पवार, प्रकाश डावळ यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर स्वागत गीताने सभेला सुरुवात करण्यात आली. यावेळी मंडळाचे सरचिटणीस अनिल गोविंद भुवड यांनी २४ एप्रिल २०२४ वार्षिक सर्वसाधारण सभा, गावपातळीवर हनुमान मंदिर जीर्णोद्धार निधी संदर्भातील सभा आणि आवक,जावक पत्राचे वाचन केले. त्यानंतर यथोचित मान्यवर आणि गावातील जेष्ठ नागरिक, आणि महिला यांचा पुष्पगुच्छ, शाळ देऊन सन्मान करण्यात आला. अंकुश नाटेकर (महाराष्ट्र पोलीस) प्रमोद सावंत, राजेश सावंत, किशोर पवार, सौ. स्नेहल कुळे, सौ. कविता सावंत, सौ. ईशा भेकरे आदींनी मनोगत व्यक्त केले.

त्यानंतर मंडळाचे खजिनदार प्रकाश महादेव डावळ यांनी जमा-खर्च सावंत, विनय कुळे, मे. के. के. फॅशन वर्ल्ड ग्रुप यांचा सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन  गौरव करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थी गुणगौरव सोहळा झाला. यात  पार्थ लहु नाटेकर (एसएससी ८६.२० टक्क), तन्वी अनिल भुवड (एचएससी ६५ टक्क), अंकुश गोविंद नाटेकर (महाराष्ट्र पोलीस), ईशा ईतेश भेकरे (कुपर रुग्णालय परिचारिका), भाग्यश्री मंगेश भुवड (सुर्या हॉस्पिटल परिचारिका), डॉ. वैभव राजन दळी (एमबीबीएस), विराज सुनिल कुळे (सायन्स फॅस्टीवल), मनाली महेश शिगवण (अधिवक्ता), लक्ष्मण गंगाराम भेकरे (अधिवक्ता), पूजा नरेश कुळे (बीफार्मसी), मयुरी प्रविण कुळे (एमकॉम), अक्षता अरुण भुवड (एमकॉम), भावेश राजेश सावंत (एचएससी, क्रिकेट सिझन बॉल), मेहक अल्ताफ खान (एचएससी ७४.५० टक्के) प्राजक्ता अरुण सावंत (एमएससी, विज्ञान पारंगत), सायली अरुण सावंत  (एमएससी विज्ञान पारंगत), यशिका अनिल कुळे (बेसिक संगणक), नागेश प्रमोद सावंत (बॉडी बिल्डर) ऋतुजा महेश चव्हाण (पदवी) यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

अंकुश नाटेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना धोपावे ग्रामविकास मंडळ मुंबई चांगले काम करीत असल्याचे नमूद करतानाच या मंडळातील कार्यकर्ते प्रामाणिक गावाची सेवा करीत असल्याचे सांगितले. त्यानंतर राजेश सावंत, विलास निंबकर यांनी मनोगत व्यक्त केले.

धोपावे ग्रामविकास महिला मंडळाची स्थापना करण्यात आली. त्यावेळी अध्यक्ष सौ. कविता राजेश सावंत, सेक्रेटरी सौ. स्नेहल सुनील कुळे, खजिनदार इशा इतेश भेकरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यानंतर पैठणीचा खेळ रंगला. यात प्रथम क्रमांक सौ. शुंभागी मनोज पवार यांनी बाजी मारली, तर द्वितीय क्रमांक  सौ. अमिषा अनिल भुवड यांनी पटकावला. तसेच धोपावे ग्रामविकास मंडळ (मुंबई) रजि.मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये कार्याध्यक्ष प्रमोद शांताराम सावंत, अध्यक्ष अनिल लक्ष्मण चव्हाण, उपाध्यक्ष मनोज शांताराम पवार, उपाध्यक्ष कृष्णा शांताराम कुळे, सरचिटणीस अनिल गोविंद भुवड, सहचिटणीस किशोर शंकर पवार, सहचिटणीस विनय कृष्णा कुळे, खजिनदार सुनील प्रकाश कुळे, सहखजिनदार संतोष बाळू वरवेलकर, तसेच कार्यकारणी सदस्य संदीप चाळके, वामन पवार, बलवंत पवार, लवु पवार, प्रकाश डावळ, प्रथमेश टेमकर, सुनील डावळ, चंद्रकांत कुळे, सुरेश कुळे, राजेश सावंत, अनिल शिंदे, विजय सावंत, भुषण गुरव, भालचंद्र निमकर, अंकुश नाटेकर, निकेश जाधव, लक्ष्मण भेकरे यांची एकमताने निवड करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!