संपर्क युनिक फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद : विनोद चाळके

रत्नागिरी : आरोग्य सेवेत क्रांती केलेल्या स्वास्थ मित्र संस्थेचे संस्थेचे राज्य व्यवस्थापक तसेच संवेदना फाउंडेशन मुंबईचे संस्थापक अध्यक्ष विनोद चाळके यांनी आपल्या टीमसह येथील संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओच्या रुग्ण मदत केंद्राला भेट दिली. स्वास्थ मित्र संस्थेचे कार्य सध्या जम्मू काश्मीर, पंजाब, दिल्ली, महाराष्ट्र या ठिकाणी सेवा सुरू असून, येथील संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओच्या कामकाजाची दखल घेऊन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी याठिकाणी भेट दिली.
संस्थेच्या कामाबाबत समाधान व्यक्त करतानाच संस्थेला “स्वास्थ्य मित्र”चे संपूर्ण सहकार्य लाभेल, असे अभिवचन देवून संस्थेचा सन्मान केला. हा सन्मान एनजीओचे अध्यक्ष शकील गवाणकर यांनी स्वीकारला.

यावेळी एनजीओचे सचिव युसुफ शिरगावकर, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष जमीर खलफे उपस्थित होते. त्यानंतर एनजीओचे सल्लागार सुहेल मुकादम, रुग्ण मदत केंद्राचे प्रमुख ईस्माइल नाकाडे यांची भेट घेऊन एनजीओच्या कामाची प्रशंसा केली.


