जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी शिवसेनेची पहिली उमेदवार यादी जाहीर

रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे उपनेते उदय सामंत यांनी आज रत्नागिरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी शिवसेनेची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. यावेळी त्यांनी महायुतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त करत, महायुती ५६ पैकी ५६ जागा जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलेल्या यादीनुसार जिल्हा परिषद गट खेडशीमधून हर्षदा भिकाजी गावडे, मुचरी गटात माधवी गीते, कसबा गटात रचना महाडिक, झाडगाव गटात श्रद्धा दीपक मोरे, पावस गटात महेंद्र मांडवकर, खालगावगटात महेश म्हाप, गोळप नंदकुमार मुरकर, वेळणेश्वर गटात नेत्रा ठाकूर, पडवे गटात महेश नाटेकर यांचा, तर पंचायत समिती हातखंबा गणात विद्याविलास बोमल, देवड गणात नेहा गावणकर, नाणीज गणात डॉ. पद्मजा संजय कांबळे यांचा समावेश आहे.


