मुख्य बातमी

जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता, भावनिक ऐक्य आणि सामंजस्यासाठी काम करीन

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सद्भावना दिवस’ निमित्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ

रत्नागिरी : भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामाजिक सामंजस्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प करत, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज ‘सद्भावना दिवसानिमित्त सामूहिक शपथ घेतली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नायब तहसीलदार संजय भिसे यांनी उपस्थितांना सद्भावना दिनाची प्रतिज्ञा दिली.

“मी अशी प्रतिज्ञा करतो/करते की, मी जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता, सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करीन. मी आणखी अशी प्रतिज्ञा करतो/करते की, आमच्यामधील सर्व प्रकारचे मतभेद मी हिंसाचाराचा अवलंब न करता विचार-विनिमय करून व संविधानिक मार्गाने सोडवीन.”

या प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही शपथ घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!