हर्डी येथे हनुमान जयंती उत्सवाचे आयोजन

राजापूर : शहरानजीकच्या हर्डी येथे १ आणि २ एप्रिल रोजी श्री हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
१ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता श्रींची नित्य पूजा, सायंकाळी ६ वाजल्यापासून अखंड राम नाम जपाला सुरुवात करण्यात येणार असून २ रोजी सकाळी सहा वाजेपर्पंत जप सुरू रहाणार आहे. त्यानंतर ६.३३ वाजता श्री मारुतीरायाचा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. सकाळी ८ वाजता मारुतीरायाचे दर्शन १० वाजता सत्यनाराण महापूजा, ११ वाजता तिर्थ प्रसाद, दुपारी १.३० ते ३.३० यावेळेत महप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजल्यापासून स्थानिक भजने, रात्री ८ वाजता मान्यवर, ज्येष्ठ नागरिक व विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ करण्यात येणार आहे. रात्री १० वाजता करमणुकीचा कार्यक्रम म्हणून स्थानिक कलाकार बहरंगी संगीत नमन सादर करणार आहेत.
या सोहळ्याला उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन हर्डी गावचे गावप्रमुख व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.


